18/07/2026
🌴 14 वर्षांची झाडे तोडली नाहीत... जिवंतच दुसऱ्या ठिकाणी हलवली! 😲
असा प्रवास तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल... शेवटपर्यंत नक्की पहा!
नमस्कार मंडळी...
आज आम्ही तुम्हाला एक असा प्रवास दाखवणार आहोत, जो केवळ बांधकामाचा नाही, तर निसर्ग जपण्याचा आहे.
हे आहे आपले २७ सप्टेंबर २०१२ ला चालू केलेले जय मल्हार हॉटेल आणि आताचे जय मल्हार ॲग्रो रिसॉर्ट.
नवीन बांधकाम सुरू होत असल्यामुळे, या ठिकाणी सन २०१२ मध्ये लावलेली बॉटल पामची झाड हलवणे आवश्यक झाले.
अनेकदा अशा वेळी झाडे तोडली जातात, पण आम्ही वेगळा निर्णय घेतला......
आम्ही ही झाड तोडली नाहीत... तर ती जिवंत ठेवण्याचा आणि सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी पुनर्लागवड करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी आम्ही अभ्यास करून चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यात एक छोटे झाड यशस्वीरित्या दुसऱ्या जागेवर शिफ्ट केले.. दोन महिन्यांनी झाड जिवंत असल्याची खात्री आल्यावर बाकी सर्व झाडे आम्ही हलवण्याचा निर्णय घेतला.आणि जून महिन्याच्या १२ तारखेला ही झाडे यशस्वीरित्या हलवण्यात आली.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रथम झाडाभोवती योग्य आकाराचा मातीचा गोळा (रूट बॉल) तयार करण्यात आला, जेणेकरून मुळांना कमीत कमी इजा होईल.
त्यानंतर जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने अत्यंत काळजीपूर्वक हे झाड उचलण्यात आले आणि जय मल्हार ॲग्रो रिसॉर्टमधील नव्या जागेवर सुरक्षितपणे लावण्यात आले.
पुनर्लागवडीनंतर झाडाला योग्य आधार, नियमित पाणी आणि आवश्यक ती निगा देण्यात आली.
आज या स्थलांतराला एक महिना पूर्ण झाला आहे आणि आम्हाला आनंदाने सांगावेसे वाटते की ही बॉटल पामची झाडे जिवंत राहिली असून नवीन फुटवे फुटत आहे, झाडाने नवीन जागेशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे आणि ते निरोगीपणे वाढत आहे. हा आमच्यासाठी अत्यंत समाधानाचा क्षण आहे.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते—योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि झाडांविषयीची संवेदनशीलता असेल, तर मोठी झाडेसुद्धा यशस्वीरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून वाचवता येतात.
आमचा विश्वास आहे की विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हीच खरी प्रगती आहे. नवीन इमारती उभारणे महत्त्वाचे आहे, पण त्यासाठी वर्षानुवर्षे वाढलेल्या झाडांचा बळी जाणे आवश्यक नाही.
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.
शेवटी एकच ... झाडे लावा... झाडे जगवा... कारण विकासासोबत पर्यावरण जपणे हीच आपली खरी जबाबदारी आहे.
धन्यवाद!