07/03/2024
वदनं प्रसादसनंसदयं हृदयं सुधामुचो वा:।
करणं परोपकरणं येषां केषां न ते वन्धम॥
अर्थात, ज्याचे मुख प्रसन्नतेचे आगर, हृदय हे दयेने युक्त, वाणी ही अमृताचा वर्षाव करणारी आणि ज्याचे शरीर परोपकारासाठी असते, असे हे सज्जन सर्वांनाच वंदनीय आहेत भटक्या विमुक्तांचे पालक वंचितांचे कैवारी असे हे एक आगळे वेगळे प्रतिभावान विचारवंत व्यक्तिमत्त्व 🙏🏻महान थोर असे शब्दही त्यांच्यासाठी कमी पडावेत असे आपल्या देशाची आन बाण आणि शान प्रगल्भ आणि परखड विचार धारा असलेले आदर्श समाजसुधारक "पद्मश्री कर्मवीर दादा इदाते(बाबा)'' आपल्या कार्याला त्रिवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻 तरुणांसाठी आपण खूप प्रेरणादायी आहात .1 मार्च 2024 रोजी त्रंबकेश्वरहून येताना आदरनिय दादांनी आपल्या ब्र्म्हगिरी रिसॉर्ट येथे हॉटेल वाह नाशिक मध्ये भेट दिली त्यांच्यासोबत माझी मैत्रिण मा. मंदा ताई फड ( त्यांच्यामुळेच ही ग्रेट भेट शक्य झाली)
मा. अनिल फड आणि दादांचा नातू अथर्व सोबत होते .दादांनी तब्बल 4-5 तास वेळ देऊन गप्पा गोष्टी केल्या ...सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला ❤️ त्यांच्या जीवनातील कार्याचे अनेक अनुभव सांगितले योग्य मार्गदर्शन मिळाले गप्पा मारताना तर आम्हाला अगदी घरातले वडीलधारी व्यक्तीच आपल्यासोबत आहे असे भासत होते कुठलाही गर्वाचा मागमूसही नाही (very down to earth ) इतक्या महान व्यक्तीचे आम्हाला आशिर्वाद मिळाले हे आमचे मोठे भाग्य 🙏🏻😇 दादा आम्हाला आपला नेहमीच सार्थ अभिमान 😇😊 🌹🌹🙏🏻🙏🏻